सलग तिसऱ्या वर्षीही नागपुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यास प्रशासनाने मनाई केली ही बाब लाखो आंबेडकरी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक जरी असली, तरी आंबेडकरी अनुयायांना न पचणारी व न पटणारी आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक मिलिंद खैरे यांनी फ्री मिडीयाकडे व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उफाळून येतो त्यामुळे करोनाची लागण होणे स्वाभाविक आहे, जेव्हा करोनाची लाट जोरात होती. तेव्हा कुंभमेळा उत्सव साजरा करण्यात आला. तिथेही तर लाखोंच्या संख्येत भाविक होते ना ,मग धम्मचक्र प्रवर्तन सोहळा का नको ? खरे आहे की, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते.
चौदा एकर असलेल्या दीक्षाभूमीवर प्रशासनाने मनात आणले असते तर सर्व निर्बंधासह हा सोहळा संपन्न होऊ शकला असता. शेवटी हेच खरे इथल्या सरकारांना या देशाचे हिंदुकरण करायचे आहे त्यासाठी इतर धर्मीयांना वेठीस धरण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत.