पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठक झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक गेहलोत सह इत्तर वरिष्ठ पक्षाचे ५२ नेते या बैठकीत उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदाची चर्चा होण्याची शक्यता होती. त्यावर सोनिया गांधी यांनी मोठी सुनावणी केली आहे. त्यांनी यावेळी सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणूक याविषयी देखील चर्चा केली. याच बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे.
“मी पक्षाच्या नेत्यांशी मोकळ्या मनाने बोलते पण माध्यमांद्वारे माझाशी बोलण्याची गरज नाही, असे स्पष्ट वक्तव्य दिले. प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे नूतनीकरण हवे आहे, पण यासाठी एकता आणि पक्षाचे हिट सर्वतोपरी ठेवणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या कि ‘मला माहिती आहे कि, मी अंतरिम अध्यक्ष आहे, कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका होऊ शकल्या नाही. आता पक्ष संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल’. सोनिया गांधींनी पक्षातील टीका करणाऱ्यांना, विशेषतः जी-२३ नेत्यांना उद्धेशून पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष आहे असे म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘जी-२३’ चे नेते बऱ्याच काळापासून संघटनेत व्यापक बदल आणि प्रभावी नेतृत्वासाठी निवडणूक घेण्याबाबत सांगत होत्या.
“जर तुम्ही मला पूर्ण वेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणण्याची परवानगी दिली तर मी आहे,” असे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आत्मसंयम आणि शिस्त आवश्यक आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. “संपूर्ण संघटनेला काँग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे आहे, पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी आत्म-नियंत्रण आणि शिस्त आवश्यक आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.