1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

दसरा मेळाव्यास कुणालाही परवानगी नाही

Dussehra-gathering

सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली_

मुंबई: शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, दसरा मेळाव्याला कोणालाही परवानगी देणार नसल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या अभिप्रायामुळे शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी नाकारली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर मुंबईतील प्रभादेवी येथेही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून प्रशासनाने दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई पालिकेच्या विधी आणि न्याय खात्याचा अहवाल समोर आला आहे. कुणाचा अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवू शकत नसल्याने कोणालाही परवागनी देऊ नये अशी मुंबई महापालिकेची भूमिका आहे.

विधी आणि न्याय विभागाच्या अहवालात खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मेळावा घेण्यासाठी कोणात्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची, हा प्रश्न आहे. दरवर्षी दसरा मेळव्यासाठी शिवसेनेचा अर्ज येतो.परंतु, यावेळी कोणता अर्ज अधिकृत आहे हे विधी विभाग ठरवू शकत नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कुणालाचा परवानगी देऊ नये, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

THE FREE MEDIA

THE FREE MEDIA

All Posts

Latest News

Related Post

अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलो...

October 28th, 2021 | RAHUL PATIL

मु्ंबईत एमएमआरडीएने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील वाहतुक आराखडा य...

तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांन...

November 11th, 2022 | THE FREE MEDIA

नागपूर: तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभा सदस्य आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी ठाकरे यांच्या मुं...

‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुज...

November 11th, 2021 | RAHUL PATIL

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत...