उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची जलद चाचणी करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने उत्तर कोरियाचे राज्य माध्यम केसीएनएच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.त्यातच या चाचण्याचा टाइमिंगवरही सगळ्यांचे लक्ष आहे कारण जेव्हा तालिबान अफगाणिस्तानात परतला आहे आणि अमेरिकेला (USA) तिथून परत यावे लागले आहे आणि अशातच उत्तर कोरियाने केलेल्या या चाचण्या . उत्तर कोरियाचे हे पाऊल देखील लक्षात घेण्यासारखे आहे कारण अमेरिकेसोबत अण्वस्त्र नि: शस्त्रीकरणावरून प्रदीर्घ काळ सुरू असलेला संघर्ष अजूनही संपलेला दिसत नाही.
शनिवारी आणि रविवारी झालेल्या चाचण्यांदरम्यान, या क्षेपणास्त्रांनी 1,500 किलोमीटर (930 मैल)इतके अंतर गाठले आहे. केसीएनएने म्हटले आहे की क्षेपणास्त्रांचा विकास उत्तर कोरियाची सुरक्षा अधिक विश्वासार्ह बनविण्याची हमी देतो. देशात तयार केलेल्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे शत्रु शक्तींच्या लष्करी युक्तीला जोरदारपणे रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक साधन ठरणार आहे.
हे उल्लेखनीय आहे की उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियावर प्योंगयांगच्या विरोधात धोरणात्मक शत्रुत्वाचा आरोप केला आहे. उत्तर कोरियाचे आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेबरोबरची त्याची चर्चा 2019 पासून थांबली आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की क्षेपणास्त्रांची चाचणी करणे उत्तर कोरियाच्या विचारपूर्वक धोरणाचा भाग आहे. स्वत: वर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध संपवण्यासाठी ते अमेरिकेवर चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी अशा चाचण्या करत आहेत.