बुली बाई अँप प्रकरणात मुस्लिम महिलांना टार्गेट केले गेले. आता याच प्रकरणी हिंदू समुदायातील महिलांविषयी आक्षेपार्ह्य मजकूर असणारे ग्रुप टेलिग्रामवर बनविले जात असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल केंद्रीय मंत्रालयाने घेतली आहे.
बुली बाई अँप प्रकरणात मुस्लिम समुदयातील महिलांना लक्ष केल्यानंतर काही समाज कंटकांनी हिंदू महिलांचे अश्लील फोटो टेलिग्रामवर ग्रुप बनवून शेअर केले जात आहेत. ट्विटरवरुन या टेलिग्राम चॅनेल संदर्भातही अनेकांनी तक्रार केली. याच तक्रारीची दखल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्यात आलं आहे. चॅनेल ब्लॉक केल्या गेलं असल्याची माहिती रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
तर बुली बाईनंतर अन्य कुठल्याही समुदायातील व्यक्ती किंवा महिलांबाबत अशा प्रकारे कृत्य होत असेल. तर ते संबधित व्यक्तिंनी मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दयावे. त्याची मुंबई पोलिस चौकशी करतील, तसेच वेळ पडल्यास गुन्हा नोंदवून तपासही केला जाईल.