1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आता तुमच्या सात बारा उता-यावर असणार ‘क्यूआर कोड’

QR-Code-thefreemedia
Spread the love

फसवणूकीपासून होणार कायमची सुटका

मुंबई: राज्यातील शेतकऱ्याच्या जमिनीची सारी कुंडली सात-बारा उताऱ्यावर असते. त्यामुळेच या सात-बारा उताऱ्याला ‘जमिनीचा आरसा’ असं म्हटलं जातं. शेतीबाबतची सारी नोंद या सात-बारा उताऱ्यावरच असते. शेतीच्या ‘सात-बारा’ उतार्‍यावर आता ‘क्यूआर कोड’ असणार आहे तो स्कॅन करताच जमिनीची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात कोणालाही फसवणूक करता येणार नाही.

राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सात-बारा उतारे, नकाशे, फेरफार आदी दस्ताऐवजांचे संगणकीकरण केले जात आहे. जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही मोजणी अचूक करतानाच प्रत्येक सर्व्हे नंबरचे को-ऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे.

राज्यात शेतीच्या सात-बारा उतार्‍यात एकसमानता आणल्यानंतर भूमिअभिलेख विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.. प्रत्येक सात-बारा उताऱ्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ दिला जाणार आहे.. गेल्या काही दिवसांत जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सात-बारा उताऱ्यावरील ‘क्यूआर कोड’ मोबाईलद्वारेही स्कॅन करता येईल. हा क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हे नंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर तुमच्या समोर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे सांगितले जाते.

सरकारकडे प्रस्ताव सादर

भूमिअभिलेख विभागाने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर सात-बारा उतार्‍यावर ‘क्यूआर कोड’ दिले जाणार आहेत.. सात-बारा उतार्‍यावर ‘क्यूआर कोड’ नेमका कोठे द्यायचा, याबाबत ठरलेले नाही. राज्य शासनाने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Claim Free Bets

How to scan qr code in mobile

You might be surprised by how much smarter your smartphone is. Third-party #manufacturers created apps for these devices when they first came out to fully utilise their features. There is an app for your #phone that allows you to use it as a scanner or flashlight.

How to scan whatsapp qr code

You can easily connect with a #business on WhatsApp by scanning their #WhatsApp #QRcode. The WhatsApp camera can only scan official WhatsApp QR codes.

How to get whatsapp qr code with phone number

You enter your phone number and pre-written message to start the conversation. When a person scans the QR code, WhatsApp opens on their phone with the message you have pre-written. The person taps “Send” and starts a WhatsApp conversation with you.

How to login whatsapp web without qr code

Users who use WhatsApp in the browser must scan a QR code in order to use the instant messaging platform on your computer each time you log in again.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google, Chrome ब्राउझिंग अनुभव सुधारण्यासाठी मशीन लर...

    June 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: शोध इंजिन दिग्गज Google आपल्या उत्पादनांची कार्यक्षमता अधिक चांगली करण्यासाठी मशीन लर्निंगचा जास्ती...

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...

    Twitter ने ALT badges, image descriptions रोल आऊट केले

    April 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: या आठवड्याच्या सुरुवातीला, Twitter ने ALT badges आणले आणि जागतिक स्तरावर इमेज डिस्क्रिप्शन सर्वांसम...