नवी दिल्ली: नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि २१ एप्रिल रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते.
नागरी सेवा दिनानिमित्त सर्व कर्मयोगींना पंतप्रधानांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रशासन आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुधारण्यासाठी त्यांनी सूचना देऊन सुरुवात केली. सर्व प्रशिक्षण अकादमी दर आठवड्याला पुरस्कार विजेत्यांची प्रक्रिया आणि अनुभव आभासी माध्यमातून सामायिक करू शकतात. दुसरे म्हणजे, पुरस्कारप्राप्त प्रकल्पांमधून, काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणीसाठी एक योजना निवडली जाऊ शकते आणि त्याचा अनुभव पुढील वर्षीच्या नागरी सेवा दिनात चर्चिला जाऊ शकतो असे त्यांनी सूचवले.
आधी मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून गेल्या 20-22 वर्षांपासून आपण नागरी सेवकांशी संवाद साधत असल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. हा परस्परांकडून शिकण्याचा अनुभव आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात होत असलेल्या यंदाच्या उत्सवाचे महत्त्व मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी प्रशासकांना या विशेष वर्षात आधीच्या जिल्हा प्रशासकांना जिल्ह्यात बोलावण्यास सांगितले. यामुळे जिल्ह्यात नवी ऊर्जा निर्माण होईल आणि भूतकाळातील अनुभवामुळे जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीकोनातून स्वागतार्ह गतीमानता मिळेल. त्याचप्रमाणे, स्वतंत्र भारताच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या ध्वजधारकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी राज्यांचे मुख्यमंत्री या ऐतिहासिक वर्षात माजी मुख्य सचिव, कॅबिनेट सचिवांना बोलावू शकतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या वर्षात नागरी सेवेचा सन्मान करण्याचा हा एक योग्य मार्ग असेल असे ते म्हणाले.
अमृत काल हा केवळ उत्सव साजरा करण्यासाठी किंवा भूतकाळाची स्तुती करण्यासाठी नाही. 75 ते 100 वर्षांचा प्रवास हा नेहमीसारखा असू शकत नाही. “भारत @100 हा काळ नेहमीसारखा असू शकत नाही. या 25 वर्षांच्या कालावधीकडे एक एकक म्हणून पाहिले पाहिजे आणि आतापासूनच आपली तशी दृष्टी असायला हवी. हा उत्सव प्रवाहप्रपात असावा.” या भावनेने प्रत्येक जिल्ह्याने वाटचाल करावी. प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडू नये आणि सरदार पटेल यांनी 1947 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञा आणि दिशांप्रती स्वतःला पुन्हा समर्पित करण्याची हीच वेळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले.