मध्य रेल्वे नागपूर डिव्हीजनने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. डीआरएम ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात मोबाईल अँपद्वारे ई-व्हीलचेयर सेवा नागपूर रेल्वे स्टेशनवर सुरु झाली आहे. ही, सुविधा हजरत निजामुद्दीन आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक नंतर देशातील तिसरी आहे. हि सुविधा अजनी रेल्वे स्थानक आणि मुख्य रेल्वे स्थानक या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.
प्रवासी डिबोर्डिंग आणि बोर्डिंगच्या अगोदर याचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. यामुळे गरजू लोकांना, वृद्ध प्रवाशांना तसेच रुग्णांना याचा लाभ होईल. अनेक लोक नागपुरात वैद्यकीय मदत घ्यायला येतात. हि इ- व्हीलचेअर बॅटरी च्या साहाय्याने चालते. इच्छुक प्रवासी याचे “AAS e-Wheelchair Rail” अँपद्वारे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याचे मूल्य प्रत्येकी २५० रुपये आहे, अशी माहिती एनएफआर टी.पी आचार्य यांनी दिली.
मेसर्स अरुण एव्हिएशन सर्व्हिस, दिल्ली यांनी केलेला हा मूल्यवर्धित प्रवासी सुविधा करार रेल्वेसाठी दरवर्षी 2.25 लाख नॉन-फेअर- रेव्हेन्यू (एनएफआर) जोडत आहे.
संघाचे नेतृत्व वरिष्ठ डीसीएम कृष्णनाथ पाटील यांनी केले, एनएफआर टी.पी आचार्यांनी प्रवाशांना ही सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आहे.