८ नोव्हेंबर २०१६ इतिहासात एक नवीन बदल घडवून आणणारा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ वर्षात देशाला संबोधित करतांना ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याची मोठी घोषणा केली होती. विरोधी पक्ष नेते यांनी याविषयी चांगलेच ताशोरे ओढले आहे. नोटबंदीच्या घोषणेनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ट्विटवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सोमवारी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
ब्रायनने नोटबंदीला अर्थव्यवस्थेचा ‘काळा दिवस’ चा करार देत ट्विटमध्ये लिहिले आहे, ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री नोटबंदीची घोषणेच्या काही वेळेनंतर नोटबंदीमुळे होणारे नुकसान फक्त ममता बॅनर्जी पकडू शकल्या होत्या आणि या निर्णयाला निर्दयी घोषणेचे नाव दिले होते.
“नोटबंदीच्या घोषणेनंतर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी ने म्हटले होते कि, सरकारने या कठीण निर्णयाला मागे घ्यावे. परदेशातून काळा पैसा आणण्याचे दिलेले आश्वासन पंतप्रधानांना पूर्ण करता आलेले नाही, त्यामुळे आपले अपयश लपवण्यासाठी हे नाटक आहे. ही आर्थिक अराजकता आहे आणि भारतातील सामान्य लोकांवर आपत्ती आहे.”
नोटबंदी नंतर देशात चांगलीच खळबळ माजली होती. लोकांना नोटा बदलण्याकरिता बँकांच्या बाहेर लांब लांब रांगा लावाव्या लागत होत्या. नंतर सरकारने ५०० च्या व २००० च्या नवीन नोटा बाजारात आणल्या. सरकारने तर्क लावला होता कि नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा घालता येईल.