नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला कलाकांराकडून विविध कलाप्रदर्शन साजरे करण्यात येणार आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या ओपन एअर थिएटरमध्ये संध्याकाळी 6 वाजता स्वर सखी मंच, नागपूर यांच्याकडून ‘स्त्री निनाद’ प्रस्तूत केले जाईल. यात युवा कलाकार फ्युजन सादर करतील. त्यानंतर स्वराली संगीत संस्था, नागपूर यांच्याकडून ‘महिला वाद्यवृंद’ हा सतार, व्हायोलीन, हार्मोनियम, बासरी, मायनर आणि तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे.
संध्याकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी, नागपूर येथे प्राचार्य राम शेवाळकर प्रतिष्ठान यांच्याकडून प्रभाकर दुपारे लिखीत रमाई चे सादरीकरण करण्यात येईल. सर्व कार्यक्रम जनतेसाठी खुले असणार आहेत.