जगातील भ्रष्ट देशांची यादी जाहीर करण्यात आली असून, 180 देशांच्या या यादीत भारत 80 व्या स्थानावर आहे. भारताची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. 2018 मध्ये भारत या यादीत 78 व्या स्थानावर होता. यावरून भारतातील भ्रष्टाचार वाढल्याचे समोर येत आहे. भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक 2019 ची ही यादी भ्रष्टाचाराचा अभ्यास करणारी संस्था ट्रांसपरेंसी इंटरनॅशनलने केली आहे.
या यादीत भारत 41 गुणांसह 80 व्या स्थानावर आहे. भारतासह चीन, घाना, बेनिन आणि मोरक्को यांचे देखील 41 गुण आहेत. मात्र शेजारील देशांपेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे. पाकिस्तान या यादीत तीन स्थानांनी घसरूण 120 व्या स्थानावर पोहचला आहे. श्रीलंका 93, नेपाळ 113 आणि बांगलादेश 146 व्या स्थानावर आहे.
जागतिक भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकानुसार दोन तृतीयांश देशांचे गुण 50 पेक्षा कमी आहेत व त्यांची सरासरी 43 आहे. 2012 पासून आतापर्यंत केवळ 22 देशांमधील भ्रष्टाचार कमी झाला आहे. ज्या देशांमधील भ्रष्टाचार गेल्या काही वर्षात कमी झाला आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, निकारागुहा, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे.
या निर्देशांकानुसार, डेनमार्क आणि न्यूझीलँडमध्ये भ्रष्टाचार सर्वात कमी आहे. तर सर्वाधिक भ्रष्टाचार सोमालिया, सूडान, सीरिया या देशांमध्ये होत आहे.
सर्वात कमी भ्रष्टाचार होणारे टॉप-10 देश
डेनमार्क
न्यूझीलँड
फिनलँड
सिंगापूर
स्टीडन
स्विर्झलँड
नॉर्वे
नेदरलँड
जर्मनी
लक्झमबर्ग