प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११७ जणांना पद्मश्री देण्यात आला. यामध्ये वाराणसीमधील कबीरनगर येथे राहणारे शिवानंद बाबा यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला. त्यांचे वय १२६ वर्षे असून ते तंदुरूस्त आहेत. आधारकार्ड आणि पासपोर्टवर त्यांची जन्म तारीख ८ ऑगस्ट १८९६ अशी आहे. यानुसार ते जगातील सर्वांत वयस्कर आहेत.
शिवानंद बाबांनी सांगितले की, ते फक्त शिजवलेले अन्न सेवन करतात. ते दूध, फळ याचे सेवन करत नाहीत. ते दररोज पहाटे 3 वाजता उठून योगा करतात. त्यानंतर ते पूजा पाठ करून आपल्या दिवसाची सुरूवात करतात. यामूळे ते 126 वर्षे जगले आहेत आणि तंदुस्त आहेत.
पद्म पुरस्कारांवर उत्तर प्रदेशची मोठी छाप !
२ मरणोत्तर पद्मविभूषण, २ पद्मभूषण, ९ जणांना पद्मश्री
बाबांना पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. शिवानंद बाबा म्हणतात की जीवन सामान्य पद्धतीने जगले पाहिजे. त्याचवेळी बाबांचे वैद्य डॉक्टर एस.के. अग्रवाल यांनी सांगितले की, बाबा सात्विक अन्न खातात आणि पूर्ण शिस्तीने जीवन जगतात. त्यांच्या आयुष्यात योगा महत्त्वाचा आहे.