श्रावण मास संपण्याची वाट बघणारे नागपूरकर व राज्यातील सर्वच नागरिकांच्या खिशास चाप बसणार असल्याची माहिती आज ‘फ्री मिडीया’शी बोलतांना नागरीकांनी दिली. कालपासून शहरात संततधार सुरु असतांना, तान्हा पोळा व पाडव्यावर विरजन पडते की काय? या संभ्रमात असतांना आज वरूण राजाने कृपा दाखवत विश्रांती घेतली आहे.
बकरा मंडीत सहज फेरफटका मारतांना “भाजी मार्केट” पेक्षा गर्दीला ऊत आलेला दिसला.सर्वांची पाऊले मटण विक्रेत्याच्या दुकानाकडे सरसावतांना दिसली. फ्री मिडीयाशी संवाद साधतांना, नागरिकांच्या प्रतिक्रीया तितक्याच बोलक्या होत्या. कोरोनाचा काळात धास्तावलेल्या नागरिकांनी गतसालपेक्षा यंदा कोरोनाची भीती नसल्याचे सांगत, आम्ही या महामारीपासून सावध झालो असल्याचे सांगितले.
मटण विक्रेत्याशी संवाद साधला असता, मागील सप्ताहापेक्षा दर अधिक असल्याचे माहितीवजा सांगितले. सध्या बाजारात ७०० ते ८०० रू किलो मटणाचा भाव असून सकाळपासून फोन बुकींग ते नागरिकांची रांग लागलेली बकरा मंडीत चित्र पहायला मिळाले. यंदाचा पाडवा हा गतसालपेक्षा कुटुंबासह आनंदात साजरा करणार असल्याचेही काहीजण म्हणाले. खरे पाहता नागपुरातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला; जरी मटणाचे भाव गगनाला भिडले असले तरी; सावजी मटणाची चव घेण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याच्या प्रतिक्रीया जनतेतून येत आहे.