मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. परिणामी परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं.