नागपूर:चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोइंग 737 विमान क्रॅश (Boeing 737 crash ) होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे. १२३ प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते,त्यातील ९ क्रू चे सदस्य होते. अशी प्राथमिक माहिती आहे. किती जण दगावले आणि किती वाचले आहेत यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही.
विमान गुआंगशी या प्रांतात जंगलात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाल्याची माहिती आहे. विमानातून प्रवास करणारे १२३ प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रायटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीनचं बोइंग 737 हे विमान Kunming येथून Guangzhouकडे जात होतं. हे विमान Guangxi या भागात कोसळलं आहे. यानंतर विमानानं पेट घेतला. विमान कोसळल्यानंतर पेट घेतल्यानंतर जंगल देखील पेटल्याचं समोर आलं आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, विमानतळ कर्मचार्यांनी सांगितले की, ईस्टर्न चायना फ्लाइट MU5735 गुआंगझूमध्ये त्याच्या निर्धारित गंतव्यस्थानावर वेळेवर पोहोचले नाही. FlightRadar24 च्या माहितीनुसार, विमानाने सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.11 वाजता कुनमिंग शहरातून उड्डाण केले. सुमारे एक तासानंतर, दुपारी 2:22 वाजता, 3225 फूट उंचीवर असलेल्या विमानाचा ट्रॅक रेकॉर्ड संपला. यावेळी विमान ताशी 376 किलोमीटर वेगाने उड्डाण करत होते.