मुंबईतील ड्रग छापेमारीनंतर घडत असणाऱ्या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना भावनिक साद घातली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं (NCB) मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीचा पदार्फाश केला. एनसीबीच्या या कारवाईवर एनसीपी नेते नवाब मलिक यांनी आरोप केले. त्यानंतर आता हे प्रकरण इतकं पेटलं असून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे राज्यात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा संघर्ष पाहायला मिळाला. या दरम्यान समीन वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पत्रकार परिषद वानखेडे कुटुंबीयांची भूमिका मांडली होती. त्यानंतर क्रांतीने हिंदी तसंच मराठी वृत्त वाहिन्यांना मुलाखती देऊन तिची बाजू स्पष्ट केली आहे.
या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली आहे.
क्रांतीने काय म्हटलं आहे पत्रात?
क्रांतीने तिच्या कुटुंबीयांना होणारा त्रास या पत्रात नमूद केला आहे. तिने असं म्हटलं आहे की- ‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले… कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायंत.’