सरकारने जारी केली नियमावली
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी मविआ सरकारने सोमवारी (११ ऑक्टोबर) रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. मात्र या बंदला महाराष्ट्रातील अनेक व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. यावरूनच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात गुलाब चक्रीवादळाने शेतीचे, रस्त्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच यावरून देखील गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर ट्विट करत निशाणा साधलाय.
ट्विट मध्ये पडळकर म्हणाले की, शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे. अवकाळीने शेतीचे नुकसान झाले आहे. आणि अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता संताप व्यक्त केला आहे.