जरंडेश्वरचे मालक यात मोहन पाटील हे नाव आहे. हे विजया पाटील यांचे पती आहेत. नीता पाटील, विजया पाटील या कोण आहेत? मोहन पाटील कोण आहेत? अजित पवार सांगतात माझ्या बहिणीचा काय संबंध? बहिणीच्या नावावर अनेक कंपन्या आहेत अजित पवारांच्या नामी-बेनामी कंपन्यांना सहभागी कल्पतरू प्रोमोटर्स ही कंपनी कोणाची? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार अजित पवारांवरती किरीट सोमय्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
सोमय्या पुढे म्हणाले जरंडेश्वरपासून मालकांपर्यंत पोहोचायला मध्ये 27 जण आहेत नामी-बेनामी अशा 57 कंपन्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. गेल्या चार दिवस पवारांवर इन्कम Income Tax टॅक्स च्या धाडी सुरू आहेत पण पैशाची टोटल लागत नाही. पुण्यात कुठेही पाहा 7/12 वर पवारांचंच नाव. रेकॉर्डवर On Record Property एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल असंही सोमय्या म्हणाले.
जरंडेश्वर चे सभासद येऊन भेटले
27 हजार सभासदांचा कारखाना काढून घेतला मी तेव्हा पासून विचारतोय या कारखान्याचा मालक कोण ? हातातील कागदपत्र दाखवत उच्च न्यायालयाने जरंडेश्वर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं असल्याचही सोमय्यांनी सांगितलं तसेच याबाबत EOW कडे गुन्हा दाखल तपास सुरू आहे, ED कडे तक्रार आहे. अजित पवारांनी कारखान्याचा स्वतःच अर्थमंत्री म्हणून लिलाव केला आणि स्वतःच्याच कंपनीला कारखाना विकला तो ही बेनामी विकला असही ते म्हणाले