आमची मानसिकता किती भिकारी असावी
विधानसभेत मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनचा मुद्दा उपस्थित भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच निशाणा साधला. ‘वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण पेंग्विनचा खर्च ६ लाख आहे. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी’ असं म्हणत निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले ,’मला एक गरीब विद्यार्थी असं म्हणाला की मला नोकरीच मिळत नाही. आत्ता मी १०० रुपये रोजीनं काम करतो. मी म्हटलं चांगले दिवसही येतील ना. तो म्हणाला साहेब मला तर वाटतं की खरंच मरावं आणि राणीबागेच्या पेंग्विनच्या रुपाने जन्म घ्यावा. पण मी विचारलं, असं तुला का वाटतं? तो मला हिशोब सांगत होता, की त्या पेंग्विनवर रोज २० हजार रुपये खर्च होतात. एका तासाला ८३३ रुपये म्हणजे महिन्याला ६ लाख रुपये खर्च होतात.”