महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पेन्शन यात्रा ही गोंदिया ते मुंबई अशी जाणार असून वर्धा जिल्ह्यामधून अंदाजे २० आक्टोबरला शिरकाव करून जाणार आहे, तरी सर्व पेन्शन शिलेदारांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रफुल्लकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष, म.रा.जुनी पेंशन हक्क संघटन,वर्धा यांनी केले आहे. जिल्ह्यातील NPS/DCPS ग्रस्तांची Google Meet सभा दि.04 ऑक्टोबर 2021 रविवार
सायंकाळी 7.00 वाजता संपन्न झाली.यावेळी कांबळे बोलत होते.
सभेला खालील विषयावर चर्चा करण्यात आली..
👉राज्यस्तरीय पेंशन संघर्ष यात्रा
👉NPS संदर्भाने मृत कर्मचारी,फॅमिली पेंशन,ग्रॅच्युएटी ई.बाबत चर्चा
👉जिल्हास्तरीय सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन करणे
वरील महत्वपूर्ण विषय लक्षात घेता राज्यकार्यकरणी ने ठरवल्या नुसार पेन्शन संघर्ष यात्रा ही वर्धा जिल्हा मधून जात आहे यासंबंधी सर्व माहिती राज्य संपर्क प्रमुख शसुशील गायकवाड यांनी दिली. त्यानंतर आपल्या जिल्हात यात्रा आल्यानंतर सर्व जिल्हा कार्यकारणी यांनी कशा प्रकारचे नियोजन ठेवावे. त्या नियोजनात बाबत नागपूर विभागीय सचिव हेमंत पारधी यांनी मागदर्शन केले.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी पेन्शन यात्रेसंबधी योग्य चर्चा घडवून आणुन तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष चे मत जाणून घेतले,सर्वांनी सकारात्मक तयारी दर्शीविली. बैठकीचे सूत्र संचालन कृष्णा तिमासे यांनी केले तर, मनोज पालिवाल यांनी आभार मानले.
Google मीटिंग ला जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल्ल कांबळे सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिन शंभरकर सर, जिल्हा सचिव श्री.प्रमोद खोडे सर, जिल्हाकार्याध्यक्ष श्री.क्रिष्णा तिमासे सर, महिला संघटिका अश्विनी वानखेडे मॅडम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष बोटरे सर, जिल्हा सरचिटणीस श्री. मनोज पालिवाल सर, समुद्रपूर तालुकाध्यक्ष श्री.समीर वाघमारे सर, हिंगणघाट तालुकाध्यक्ष श्री.गजानन भोंग सर, कारंजा तालुकाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर निमकर सर, आष्टी तालुकाध्यक्ष श्री.ओम पिंपळकर, आर्वी तालुकाध्यक्ष श्री.धर्मेंद्र राऊत, वर्धा तालुकाध्यक्ष श्री.मंगेश भोमले सर, देवळी तालुकाध्यक्ष श्री.रितेश निमसडे सर सेलू तालुकाध्यक्ष श्री. विनोद वाडीभस्मे सर, इ.पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हातील सर्व तालुक्यातील भरपूर NPS/DCPS धारक सुद्धा उपस्थित होते.