सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात क्रमशः 25 आणि 31 पैशांची वाढ करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी इंधनाचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग झाले आहे.
ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 101.64 रुपयांवर तर डिझेलचे दर 89.87 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईतील पेट्रोलचे दर 107.71 तर डिझेलचे दर 97.52 रुपयांवर गेले आहेत.
प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल-डिझेलचे दर क्रमशः 102.17 आणि 92.97 रुपयांवर गेले आहेत तर तामिळनाडूतील चेन्नई येथे हेच दर क्रमशः 99.36 आणि 94.45 रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्यामुळे इंधन दरात वाढ करावी लागत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.