विकासाच्या नावानं चांगभलं…!
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५-३५ पैशांनी वाढ केली. विकासाच्या नावानं चांगभलंच होतांना दिसताय. या वाढीनंतर गुरुवारी दिल्लीच्या बाजारपेठेतील इंडियन ऑइल (IOC) पंपावर पेट्रोलचा दर १०८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९७.०२ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
पेट्रोल ७.१० रुपयांनी महागलं आहे
गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी महागले होते, तर डिझेलही प्रतिलिटर २५ पैशांनी महागले होते. वास्तविक, गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढू लागले आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. यामुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७.१० रुपयांनी महागले आहेत.
डिझेल ८.४० रुपयांनी महागले
डिझेलचा बाजार पेट्रोलपेक्षा वेगाने वाढला. व्यावसायिक दृष्टिकोनातून डिझेलचे उत्पादन पेट्रोलपेक्षा महाग आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकले जाते. २४ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या तेजीत ते ८.४० रुपये प्रति लिटरने महागले आहे.