आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुहूर्त साधून लोकसभा आणि राज्यसभा अश्या दोन स्वतंत्र वाहिन्यांचे एकत्रीकरण करून एकाच संसद वाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते श्रीगणेशा करण्यात आला.संसदेत मांडले जाणारे अनेक मुद्दे आणि त्यावर होणारी चर्चा चर्चा तरुणांना शिकण्यासाठी उपयोगी ठरेल.
संसद सदस्यांनीही आपणास पाहिले जात आहे या गोष्टीचे भान राहून संसदेत योग्य वर्तन करण्यास आणि मुद्यांवर चर्चा करण्याची प्रेरणा मिळते. भारत लोकशाहीची जननी आहे.देश विकासात समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानासोबत ही वाहिनी जोडली जाईल असेही ते म्हणाले.समाज माध्यम आणि ओटीटी प्लॅटफॉर्म वर ही वाहिनी उपलब्ध असेल.