इंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श शिक्षिका सौ.निर्मला रमेश मचाले-पवार यांचा “नवांकुर”हा कविता संग्रह मराठीचे शिलेदार समूह नागपूर यांच्या वतीने प्रकाशित झाला असुन त्याचे लोकार्पण झालेबद्दल इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कवयित्री सौ.निर्मला मचाले-पवार यांचा हा पहिलाच स्वलिखीत कविता संग्रह असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांना मराठीचे शिलेदार समूहाकडून मराठीतील कविता,चारोळी,हायकू या लिखाणाबद्दल मराठी "साहित्य सेवा सन्मान" नागपूर येथे जेष्ठ नाट्यलेखक दादाकांत धनविजय यांचे हस्ते व समुहाचे अध्यक्ष राहुल पाटील यांचे उपस्थितीत देण्यात आला आहे.
शिक्षक पतसंस्थेत त्यांच्या नवांकूर काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी कवयित्री निर्मला मचाले व त्यांचे पती श्री.छत्रपती हायस्कूल भवानीनगरचे प्राचार्य रमेश मचाले या उभयतांना सन्मानित करण्यात आले.यावेळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण,व्हा.चेअरमन वसंत फलफले,संचालक ज्ञानदेव बागल,हरीष काळेल,सुनिल वाघ,किरण म्हेत्रे,नितीन वाघमोडे,संभाजी काळे,विलास शिंदे,हनुमंत दराडे,नाना नरुटे,आदिनाथ धायगुडे,बालाजी कलवले,सुनंदा भगत,सचिव संजय लोहार उपस्थित होते.