महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे.
परंतु चैत्यभूमीवर पोलिसांनी काही अनुयायांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी गोंधळ घातला होता. यामुळे चैत्यभूमीवर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेकोरोना नियमाच्या अंतर्गत चैत्यभूमीच्या परिसरात बॅरिकेड लावण्यात आले होते. काही अनुयायांनी बॅरिकेड ओलांडून चैत्यभूमीवर शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. या अनुयायांनी पोलिसांसोबत झटापट झाल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दादरमध्ये अनेक अनुयायी दाखल झाले होते.
मात्र, यावेळी सरकारकडून त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी सुविधांची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडे विरोधात घोषणाबाजी महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. वानखेडेंनी अभिवादन करून जाताना भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वानखेडे विरोधात घोषणाबाजी केली. ‘आज जो लढा सुरू आहे. त्यासाठी मला इथे प्रोत्साहन मिळते,’ असे वानखेडेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. ‘वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही,’ भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.