उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अटक झाली नाही. अशिष मिश्रा फरार झाल्याचे वृत्त आहे. यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी अशिष मिश्राच्या दरवाजावर समन्स चिटकवले आहे.
याबाबत अशिष मिश्राचा चुलत भाऊ अमित मिश्राने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अशिष मिश्रा कोर्टात हजर राहतील, अशिष मिश्रा फरार झाल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही, मी सध्या अशिषच्या संपर्कात नाही मात्र ते आज संध्याकाळपर्यंत न्यायालयात उपस्थित राहतील. असे अशिषच्या चुलत भावाने सांगितले आहे.
पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अशिष मिश्रांच्या घरावर समन्स चिटकवले होते. मात्र तरीही अशिष मिश्रा क्राईम ब्रांचसमोर हजर झाला नाही. आज सकाळी १० वाजता चौकशीसाठी अशिष मिश्राला क्राईम ब्रांचने बोलावले होते. आशिष मिश्रा लखीमपूर आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात लपल्याची माहिती आहे.