उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतायत बघा..
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या घातक प्रकाराबद्दल जगभरातील देश चिंतेत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेसने दिलेल्या माहितीनुसार ‘देशात आतापर्यंत या प्रकाराचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. शास्त्रज्ञांनी त्याला B.1.1.529 असे नाव दिले आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या या नव्या व्हेरीय़ंटचे वर्णन व्हायरसचे गंभीर चिंताजनक रूप म्हणून केले आहे. या व्हायरसचा धोका लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने उपाययोजनांच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला तरी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आज आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधानत मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे.’ असं म्हणत पवार यांनी पुन्हा एकदा निर्बंध लागण्याचे संकेत दिले आहेत.
हा धोका लक्षात घेता त्यांना पत्रकारांनी जंम्बो कोविड सेंटरबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड रूग्णालय सुरूच ठेण्यात येणार आहे, त्याबाबतचा निर्णय 31 डिसेंबर रोजी घेतला जाईल.’ असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, मॉल्स, थिएटर्स सुरू करण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात सुध्दा पुन्हा निर्बंध लावण्यात येणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.