दिलीप वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्यांना खडसावलं
मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुरूच आहे. नवनीत राणा, रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला, तर दुसरीकडे मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. गेल्या २४ तासांत सुरू असलेल्या राड्यावर आणि राष्ट्रपती राजवटीच्या पुढे आलेल्या मागणीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
या आणि याच्यासारख्या अनेक… मग कोरोना काळातसुद्धा मंदिरं बंद आहेत. मंदिरं सुरू करा. असे विविध प्रकार करून राज्यात असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की, या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावा. ते इतकं सोप्पं नाही. या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे सुस्थितीत आहे,” असं वळसे पाटील म्हणाले.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करायचं आहे, अशी भूमिका घेत मुंबईत आलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या घराबाहेर आज प्रचंड राडा झाल्याचं बघायला मिळालं. रात्रीपासून मातोश्री बाहेर तळ ठोकून असलेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचं घरं असलेल्या इमारतीतही शिवसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे शुक्रवारी रात्री भाजपचे मोहित कंबोज यांच्यावर मातोश्री बाहेर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनांनंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा समोर आला आहे. या सगळ्या प्रकारावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
मुंबईतील आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याच्या भाजपच्या आरोपावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “मुंबई आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. काही लोक मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे किंवा राहिली नाही, असं दाखवण्याचा विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.”
FAQs
मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ३ तासांत कापणार अंतर
लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; मिळणार स्थायी कमिशन
बिहारमध्ये महागठबंधन तुटले; काँग्रेस आरजेडी लढणार स्वतंत्र निवडणूक
चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; विमानांची उडाणे रद्द, शाळांना ठोकले कुलूप तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन