पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनचे शनिवारी सकाळी ११ वाजता विडिओ कॉन्फेरेंसिन्गच्या माध्यमातून उदघाटन केले.
तसेच त्यांनी सरदारधाम भवनचे लोकार्पण व कन्या छत्रालयाच्या फेज २ चे देखील भूमिपूजन केले.
याच्या माध्यमातून समाजात दुर्बल वर्गाच्या प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सरदारधाम सातत्याने काम करत आले आहे.
अहमदाबाद येथील सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत.
कन्या छात्रालय मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देत आहे आहे.
ही सुविधा कोणत्याही आर्थिक मापदंडाविना उपलब्ध आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल या प्रसंगी हजर होते.
यावेळी त्यांनी गणेश चतुर्थीच्या आणि ऋषी पंचमीच्या शुभेच्छा दिल्या, ऋषीपंचमीचे महत्व देखील सांगितले.
सरदारधाम भवन प्रोजेक्टचे तपशील :
यात १००० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले लायब्ररी,४५० सीट सभागृह, प्रत्येकी १००० व्यक्तींचे दोन बहुउद्देशीय हॉल, इनडोअर गेम्स आणि इतर सुविधा आहेत.
१००० संगणक प्रणाली, ग्रंथालय, उच्च तंत्रज्ञान वर्गखोल्या, व्यायामशाळा, सभागृह, बहुउद्देशीय हॉल असलेली ई-लायब्ररी उपलब्ध आहे.
५० लक्झरी खोल्यांसह निवास आणि इतर सुविधांसह व्यवसाय आणि राजकीय संमेलन प्रदान केले आहे.एकूण ७.१९ लाख चौरस फूट मध्ये पसरले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा ५० फूट उंच कांस्य पुतळा इमारतीच्या समोर लावण्यात आला आहे.