नागपूर: रशिया आणि युक्रेन यांच्या मध्ये चालू असलेल्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी सवांद साधला. त्याचे फोन वरून बोलणे जवळजवळ ५० मिनिटाचे होते. दोन्ही नेत्यांनी युक्रेनच्या विषयवार सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रपती पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना युक्रेन आणि रशिया यांच्या दलांमध्ये होणाऱ्या विषयावर स्पष्टता दिली.
युक्रेनमधील सुमीसारख्या भागात मानवतावादी मदत देण्यासाठी रशियाने केलेल्या युद्धबंदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी सुमीहून लवकरात लवकर भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीच्या महत्त्वावर भर दिला. युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनशी भारतीय नागरिकांना युक्रेन सरकार कडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल राष्ट्रपती ज़ेलेंस्की यांना धन्यवाद दिला.