पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाला भली मोठी मदत करणार आहेत. मोदी हे तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये ७५ उभे करण्यासाठी आज ५ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे भेट दिली. मोदींच्या उपस्थित देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘न्यू अर्बन इंडिया’ थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.
लखनऊ हा राजनाथ सिंह यांच्या संसदीय मदारसंघ आहे. माहितीनुसार, या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आग्रा, अलिगड, बरेली, झाशी, कानपुर, प्रयागराज, सहारानपूर, मुरादाबाद, आणि अयोध्या येथे इंटिग्रेटेड कमांड अँड कॉन्ट्रोल सेंटर, इंटेलिजंट ट्राफिक मॅनॅजमेण्ट सिस्टिम आणि शहरी पायभूत सुविधा तसेच अमृत मिशन अंतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये उत्तर प्रदेश जल निगमद्वारे बांधलेल्या पिण्याचे पाणी आणि सीवरेज व्यवस्थेसाठी एकूण ४ हजार ७३७ कोटी रुपयांच्या ७५ विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यावेकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ७५ हजार लाभार्थ्यांशी देखील यावेळेस संवाद साधला.