1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचे स्थान

PM modi

नागपूर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. मॉर्निंग कन्सल्टने एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये 75 टक्के गुणांसह पहिले स्थान मिळवण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळालांय. या सर्वेक्षणामधील विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन थेट 8 व्या क्रमांकावर गेले होते.  गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.जगातील महत्वाच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात अगोदर घेतले जाते. जगभरात नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स बघायला मिळतात.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणामध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान मिळवले हे फक्त त्यांचे यश नसून संपूर्ण देशाचे यश मानले जातंय. जगातील आघाडीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी आणि भारताच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वाढतोय, ही प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे नरेंद्र मोदी यांच्या जन्म झालाय. आज नरेंद्र मोदी त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

सोशल मीडियाच्या विचार केला तर ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या जबरदस्त आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 133.1 दशलक्ष लोक फाॅलो करतात. जगातील नेतेमंडळींमध्ये सर्वात जास्त लोक बराक ओबामा यांना फाॅलो करतात. तर बराक ओबामानंतर जगभरात ट्विटरवर नरेंद्र मोदींना लोक फाॅलो करत असून यामध्ये नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जेवढी जास्त आहे, त्यापेक्षाही मोठा त्यांचा संघर्ष बघायला मिळतो.

नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 8 व्या वर्षी RSS मध्ये प्रवेश केला. पदवीनंतर घर सोडले, धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. 1970 मध्ये ते गुजरातमध्ये परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ नेते बनले. भाजपचे दिग्गज नेते अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नरेंद्र मोदी यांचे 1998 मध्‍ये प्रमोशन करून राष्‍ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद दिले. नरेंद्र मोदी यांना सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला.

THE FREE MEDIA

THE FREE MEDIA

All Posts

Latest News

Related Post

‘राष्ट्रपती राजवट लावणे सोपे नाही’; गृहम...

April 23rd, 2022 | RAHUL PATIL

दिलीप वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्यांना खडसावलं मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुरूच आहे. नवनीत र...

अबब…! सर्वात श्रीमंत मंदिराची संपत्ती माहिती आहे का ….?

November 7th, 2022 | Nita Sonwane

नागपूर- भारतातील देवांची सुद्धा गरीब श्रीमंतीच्या यादीत विभागणी झाली आहे. देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणजे तिरुपती...

केद्रींयमंत्री नितीन गडकरींनी घेतली सुकदेव महाराजांच...

July 14th, 2022 | RAHUL PATIL

नागपूर: अखिल भारतीय धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुकदेवजी महाराज यांनी केद्रींय मंत्री नितिनजी गडकरींच्या सदिच्छा...