कोविड-१९ नवीन वेरिएंट ओमिक्रोन (Omicron) ला लक्षात घेऊन दिल्ली सरकारनी पूर्णपणे तयारी केली आहे. दिल्ली सरकारने LNJP इस्पितळात नवीन वेरिएंट करीता एक समर्पित इस्पितळ बनविले आहे. त्याच्या अंतर्गत LNJP इस्पितळत ओमिक्रोनने संक्रमित रुग्णांकरीता विलगीकरण आणि ट्रीटमेंटकरीता दोन वॉर्ड दिलेले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमिक्रॉन प्रभावित देशांमधून येणारी उड्डाणे त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘अनेक देशांनी ओमिक्रॉन प्रभावित देशांकडून येणारी उड्डाणे बंद केली आहेत. मग आपण का वेळ लावतो आहे? पहिल्या लाटेतही आम्ही परदेशी उड्डाणे थांबवण्यास विलंब केला होता. परदेशी विमाने दिल्लीला येतात, त्याचा सर्वाधिक फटका दिल्लीला बसतो. पंतप्रधान साहेब कृपया उड्डाणे तात्काळ थांबवा.”
यापूर्वी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील नवीन प्रकारच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना पत्र लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, कोरोनाचे नवीन प्रकार भारतात येऊ नये यासाठी आपण सर्वांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. युरोपसह अनेक देशांनी कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे प्रभावित भागात प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही या प्रकारामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणांहून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी घालण्यात यावी. याबाबत थोडा विलंब घातक ठरू शकतो, असे ते म्हणाले होते