नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हनुमान जयंतीच्या दिवशी गुजरातच्या मोरबी मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने हनुमानाच्या भव्य प्रतिमेचे लोकार्पण केले. या प्रतिमेची उंची १०८ फीट आहे. या लोकार्पणच्या वेळेस पंतप्रधान बोलतांना म्हणाले कि, आजच्या या पवित्र भव्य हनुमानाच्या मूर्तीचे लोकार्पण केले . यामुळे हनुमान भक्त आणि राम भक्तांकरिता हि खूप सुखदायी गोष्ट आहे. रामचरित मानसाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “भगवंताच्या कृपेशिवाय संतांचे दर्शन दुर्लभ असत. पंतप्रधान यांनी हनुमान आणि भक्ती हे सर्वांना सेवा भावाने जोडते. त्यांच्यामुळे प्रेरणा मिळते. ”
Today, we mark the special occasion of Hanuman Jayanti. In Morbi, at 11 AM, a 108 feet statue of Hanuman ji will be inaugurated. I am honoured to be getting the opportunity to be a part of this programme via video conferencing. https://t.co/qjvLIHWWiO pic.twitter.com/kbHcIxd90Z
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2022
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेलय माहिती नुसार हि मूर्ती ‘ हनुमान चार धाम परियोजना’ च्या अंतर्गत बनवली आहे. याच्या अंतर्गत चार दिशेला चार ठिकाणी हनुमानाची मूर्ती स्थापित केल्या जाणार आहे. मोरबी येथे बनलेली हनुमानाची दुसरी मूर्ती आहे. ह्या मूर्तीची स्थापना मोरबी येथील परम पूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात केली गेली आहे.
हनुमान चार धाम परियोजनेची सुरवात २००८ मध्ये झाली. हनुमान चार धाम परियोजनेची पहिली मूर्ती २०१० मध्ये शिमला येथे बनविण्यात आली हाती. देशातील दक्षिण भागात रामेश्वर मध्ये हनुमान यांची तिसरी मूर्ती वर काम सुरु होईल.