लंडन – विद्यमान महाराणी एलिझाबेथ यांनी आपला वारसदार निश्चित केला असून सध्याच्या प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी प्रिन्सेस कॅमिला यांना ब्रिटनच्या महाराणीचा दर्जा दिला जाणार आहे. जेव्हा राज्याभिषेक केला जाईल तेव्हा महाराणी कॅमिला यांना जो मुकुट परिधान केला जाईल. त्यामध्ये भारताचा फेमस कोहिनूर हिरा असणार आहे. गेल्या 70 वर्षांपासून ब्रिटनच्या महाराणींच्या मुकुटामध्ये हा कोहिनूर हिरा विराजमान झाला आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निर्णयाप्रमाणे प्रिन्स चार्ल्स आता महाराज होणार असल्याने त्यांची पत्नी कॅमिला यांना महाराणीचा दर्जा दिला जाणार.
काही वर्षांपूर्वी जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा कॅमिला यांना महाराणीचा दर्जा न देता त्यांचा प्रिन्सेस हा दर्जा कायम ठेवावा असा निर्णय झाला होता. पण प्रिन्स चार्ल्स यांच्या आग्रहामुळे राणी एलिझाबेथ यांनी कॅमिला यांनासुद्धा महाराणी हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रिन्स चार्ल्स सम्राटपदावर विराजमान होतील तेव्हा त्यांची पत्नी कॅमिला यांना महाराणीचा दर्जा उपलब्ध होईल आणि त्यावेळी त्यांच्या डोक्यावर जो मुकुट घातला जाईल.
त्या मध्ये अतिशय किमती असा कोहिनूर हिरा असणार आहे प्रिन्स चार्ल्स आता राजघराण्याचा कारभार सांभाळतील अशी घोषणा राणी एलिझाबेथ यांनी गेल्या शनिवारी केली असल्याने सर्व प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. कॅमिला ही चार्लस यांची दुसरी पत्नी आहे त्यांची पहिली पत्नी डायना अपघातात निधन झाल्यानंतर चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी लग्न केले होते कॅमिला सर्वसाधारण घराण्यातील असून त्यांना आता महाराणीचा मान मिळणार आहे.