नागपूर: उत्तर प्रदेश येथील येणारे विधानसभा निवडणुकांना घेऊन सर्वच पार्टीचे जोरदार तयारी सुरु आहे. अशातच काँग्रेसच्या नेता प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश येथील निवडणुकीसाठी पार्टीसाठी १२५ उमेदवारांची पहिली सूची जाहीर केली आहे.
१२५ उमेदवार मधून ४० टक्के महिला आहे. या वेळेस विधानसभा निवडणुकीकरिता उन्नाव बलात्कार झालेल्या पीडितेची आईला उभे केले आहे. उन्नाव बलात्कार ला घेऊन काँग्रेसने भाजपला चांगलेच घेरले होते.
प्रियंका गांधी यांनी म्हटले कि,”काँग्रेस पार्टी उत्तरप्रदेशमध्ये एक नवीन राजकीय वातावरण निर्माण करत आहेत. अशी राजकीय परिस्थिती महिला, शेतकरी, युवा इत्यादी मुद्यांवर केंद्रित केले आहे. आम्ही एका नकारात्मक अभियानात सामील होणार नाही. आमचे अभियान विकास आणि दलित, मागासलेल्या समुदायांच्या प्रगतीसाठी असेल. मी राज्यात पार्टी अधिक मजबूत करेल”.
महिलांना मोठ्या प्रमाणात तिकीट देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही महिलांबाबत बोलू लागलो तर इतर पक्षपण घोषणा देऊ लागले आहे. भाजप, सपा, रालोद, बसपा या सर्वांनी घोषणा दिल्या. यापुढे महिलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हेच आमचे यश आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यूपीमध्ये एकूण ४०३ जागा आहेत. येथे सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या टप्प्यात अंतर्गत १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.