संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. यावरुन आता मोठा वाद उफाळला आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सर्व विरोधी पक्ष राज्यसभा सदस्यांना पूर्ण अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आले. या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना सदस्यांनी माफी मागितली तर कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. तीन पक्ष आता लोकसभेतून बाहेर पडली आहेत. सोमवारी शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यावरुन हा मोठा वाद सुरु झाला आहे. तीन्ही पक्षांच्या खासदारांनी आता संसद भवन परिसरामध्ये निदर्शने सुरु केली आहेत.