नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी येथे (दि.२९ रोजी) जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या १८ कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या राज्यातील ३० साहित्यिकांचा ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे दि फ्री मीडिया कडून फेसबुक लाईव्ह देखील करण्यात आले होते.
दि फ्री मीडिया या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर असून प्रतिनिधित्व पत्रकार रेणुका किन्हेकर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात दीड वर्षाच्या कोरोना संक्रमणाच्या कालावधीत बरेच उपक्रम रखडले असल्याने आज प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा योग जुळून आला असून समारंभास लाभलेले सर्व मान्यवर विविध क्षेत्रातील ख्यातीप्राप्त मार्गदर्शक हे जणू ‘साहित्यस्तंभ’ असल्याचे म्हणाले.
प्रकाशन समारंभास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व नाट्यलेखक दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अनिल पावशेकर, प्रा.आनंद मांजरखेडे, डॉ. सोहन चवरे, प्रमुख पाहुणे म्हणून मयुर निमजे, दि फ्री मिडीया न्यूजच्या पत्रकार रेणुका किन्हेकर, विश्वस्त अरविंद उरकुडे साहित्य पीठावर उपस्थित होते.
प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून समारंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या एकूण १८ कविता संग्रहाचे लोकार्पण व साहित्यिकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
१) जीवन संग्राम : सुधाकर भुरके, नागपूर २) बकुळगंध : प्राजक्ता खांडेकर, नागपूर ३) पाझर: मीनाक्षी येनुगवार, नांदेड ४) काव्यसृष्टी : सोनाली सहारे, ब्रह्मपुरी ५) बहिणाबाई: प्रतिमा नंदेश्वर, मूल ६) शब्दसुमने (चारोळी): अंजू येवले, उमरेड ७) प्रवरेची फुले: अनिता व्यवहारे, अहमदनगर ८) स्मृतिगंध: सुधा मेश्राम, अर्जुनी मोरगाव ९) पुष्पगंध: पुष्पा डोनीवार, चंद्रपूर १०) तू ओढ सागराची: सत्तू भांडेकर, गडचिरोली ११) नवांकुर: निर्मला मचाले, पुणे १२) अंतरीच्या वेदना: राजश्रीताई ढाकणे, बीड १३) पाझर: आशा कोवे गेडाम, वणी १४) काव्यठसा: पाटील, कोल्हापूर, १५) मनलहरी: डॉ मंजूषा साखरकर, ब्रह्मपुरी, १६) विज्ञापन की दुनिया: आशीष उजवणे,नागपूर १७) ‘आम्ही हायकूकार’ प्रातिनिधिक कविता संग्रह १८) पाऊस माझा विशेषांक : राहुल पाटील
सर्व कवी कवयित्रींची सपत्निक सत्कार करण्यात आला असून संस्थेतर्फे शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथसंपदा देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेल्या ३० साहित्यिकांना ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यामध्ये सुधाकर भुरके, नागपूर, डॉ संजय पाचभाई, नागपूर, प्राजक्ता खांडेकर, नागपूर, प्रतिमा नंदेश्वर, मूल, आशा कोवे गेडाम, वणी, निर्मला मचाले पवार, पुणे, अरविंद उरकुडे, गडचिरोली, पुष्पा डोनीवार, चंद्रपूर, सोनाली सहारे, ब्रह्मपुरी,अनिता व्यवहारे, अहमदनगर, सुधा मेश्राम, गोंदिया, राजश्रीताई ढाकणे मिसाळ, बीड, स्वाती मराडे, पुणे, नागोराव कोम्पलवार, डॉ. मंजूषा साखरकर, ब्रह्मपुरी, सुलोचना लडवे, अमरावती, तारका रूखमोडे, अर्जुनी, वर्षा भांडारकर, मूल, पूजा नंदागवळी, गोंदिया, संगिता पांढरे, पुणे, सिंधू बनसोडे, पुणे, कुसुम पाटील, कोल्हापूर, अभिजीत ठमके, चंद्रपूर, पवन किन्हेकर, वर्धा, मनिषा गेडाम, चंद्रपूर, वंदना बागेश्वर, नागपूर, कुसुमलता वाकडे, नागपूर, राजू नवनागे, नागपूर, गौरव ढोक, पुसद,व आम्रपाली नवनागे, नागपूर इत्यांदीचा समावेश होता.
दुपार सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून स्वाती मराडे, पुणे तर प्रमुख पाहुणे नागोराव कोम्पलवार उपस्थित होते.
१५ निमंत्रित कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून सभागृहात उपस्थित असलेल्या काव्यरसिकांची मने जिंकली.
मान्यवरांनी आपल्या मार्दर्शनातून व्यक्त होत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीची तळमळ व्यक्त केली.
१८ पुस्तकांचा लोकार्पणव साहित्य सेवा सन्मान सोहळा ‘काव्यपुष्पाची’ उधळण करीत सरला.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार चित्रपट निर्माती कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी मानले.
कवयित्री सुधा मेश्राम, तारका रूखमोडे, ब्रेंज हब, दि फ्री मिडीया न्यूज यांनी विशेष सहकार्य केले. या समारभांस राज्यातील काव्यरसिक व साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.