नागपूर: कोरोना महामारीच्या काळात आंबेडकरी चळवळीतील अनेक शिलेदारांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कार्यकर्तृत्वा विषयी कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करणाऱ्या “शित वार्षिकांक २०२०-२१-२०२२ चे प्रकाशन आज रविवारी, २४ जुलै रोजी, मधुरम सभागृह, हिंदी मोर भवन, सीताबर्डी नागपूर येथे मोठ्या थाटात पार पडले.
या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, आंबेडकरी विचारवंत, यांनी भूषविले. डॉ. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे, वार्षिकांकाचे मुख्य संपादक प्रा. सुनील रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक थिएटर चे नरेश साखरे यांनी केले. मागील दोन अडीच वर्षांत कोरोना महामारीच्या जागतिक आपदेत आंबेडकर चळवळीने अनेक खंदे विचारवंत, कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत गमावले. या दिवंगत साथीदारांनी स्वतःच्या कर्तबगारीने आपले अस्तित्व निर्माण करून आंबेडकरी चळवळीला मोलाचे योगदान दिले. त्यांचे हे योगदान चिरस्मरणीय व्हावे व हयात असलेल्या नव्या पिढीला त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण राहावे या हेतूने “सम्यक वार्षिकांक २०२०-२१-२२” या अंकात आंबेडकरी चळवळीतील सर्व दिवंगत साथीदारांवरील मृत्यूलेख एकत्रित करुन “यांनीच दिला चळवळीला हात आम्ही कृतज्ञ आहोत” या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे.
याप्रसंगी संयोजक नरेश साखरे, मराठीचे विभाग प्रमुख डॅा. अजय चिकाटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजीत मेश्राम, आंबेडकर विचारधारेचे प्रमुख डॅा. प्रदिप आगलावे, सम्यकचे प्रमुख पी. एस.कुमार व सम्यकचे कोषाध्यक्ष श्रीकृष्णा ढोले उपस्थितीत होते.