पंजाब: आपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पूर्व अमृतसरमधून आघाडीवर, नवज्योत सिंग यांची पिछेहाटआपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पूर्व अमृतसरमधून आघाडीवर, नवज्योत सिंग यांची पिछेहाट झाली आहे. मोगा मतदारसंघात सोनू सूडची बहिण मालविका सूड यांची पिछेहाट झाली आहे.
117 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेस, आपची 22 जागांवर आघाडी
117 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेस, आपची 22 जागांवर आघाडी आहे. तर शिरोमणी अकाली दल 13 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. बसपा, पंजाब लोक काँग्रेस, संयुक्त शिरोमणी अकाली दल एकाही जागेवर आघाडीवर नाही.
काँग्रेसची 15 जागांवर, आप 18 जागांवरआघाडीवर
काँग्रेसची 15 जागांवर, आप 18 जागांवर तर शिरोमणी अकाली दल 11 जागांवर आघाडी आहे. तर भाजप 2 जागांवर आघाडी आहे. तर इतर पक्ष व उमेदवार 1 जागावर आघाडीवर आहेत.
पतियालामधून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पिछेहाट;
काँग्रेसची 16 जागांवर आघाडीकाँग्रेस 16 जागांवर, आप 14 जागांवर तर शिरोमणी दलाने 11 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपचे 2 जागांवर आघाडी आहे. तर इतर पक्षांची 1 जागांवर आघाडी आहे.
मतमोजणीत 11 हून अधिक जागांवर काँग्रेसने घेतली आघाडी;
मुख्यमंत्री सहकुटुंब गुरुद्वारात घेतले दर्शनविधानसभा निवडणुकीच्या 11 हून अधिक जागांवर काँग्रेसने आघाडीवर घेतली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चामकौर साहिब गुरुद्वारात सहकुटुंब दर्शन घेतले आहे.
पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, चामकौर साहिबमधून चरणजीत सिंग आघाडीवर, पठाणकोटमध्ये भाजपचे अश्विनी कुमार आघाडीवरसेंट्रल अमृतसरमध्ये काँग्रेसचे ओम प्रकाश सोनी, पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, नॉर्थ अमृतसर मधून शिरोमणी अकाली दलाचे अनिल जोशी, वेस्ट अमृतसरमधून काँग्रेसचे राजकुमार वेरका, आनंदपूर साहिबमधून आपचे हरजोत सिंग बैन्स आघाडीवर आहेत.