नागपूर: विधानसभा निवडणूकीत (assembly elections) कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी निवडणूक आयोगाने रैली आणि जनसभेकरिता गाइडलाईन्स जारी केल्या आहे. पण तरीही निवडणूकीकरीत कार्यक्रम घेतले जात असून तेथे कोविड नियमांचे उल्लंघन होतांना दिसत आहे. आता सोमवारला निवडणूक आयोगाने ( Election Commission of India )पंजाब निवडणुकीत प्रचाराकरिता नोटीस पाठवले आहे. पंजाबचे संगरूर येथे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Aam Aadmi Party Chief Ministerial candidate Bhagwant Mann)वर प्रचारा दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे EC ने त्यांना नोटीस पाठवलें आहे.
(Punjab) पंजाब येथे (Aam Aadmi Party)आम आदमी पार्टी चे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान हे धुरी येथून उमेदवार ( Dhuri assembly seat)घोषित झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघ धुरी ( Dhuri assembly seat)येथे पोहचले होते. धुरी सीट संगरुर जिल्ह्यात येते. पंजाब येथे आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) त्यांना निवडणूक घोषणा देणार आहे. आज दुपारी १.३० च्या सुमारास भगवंत मान जालंधर येथे प्रेस कॉन्फरेन्स घेतील. ज्यात पार्टीच्या निवडणूकीविषयी घोषणा केली जाईल.
पंजाब निवडणूकीची तारीख रविदास जयंती यांच्या यात्रेमुळे बदलली गेली. येथे निवडणूक १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार होती. आता त्याऐवजी २० फेब्रुवारी पासून घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, आता 25 जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी असेल. उमेदवारी अर्जांची तपासणी २ फेब्रुवारीला होणार असून ४ फेब्रुवारीपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. पाचही निवडणूक राज्यांमध्ये १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.