नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले होते. तसेच याकरिता परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या होत्या. पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जून २०२२ पासून घेण्यात येतील तर पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या १५ जून २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. पहिले आणि शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जून पासून होतील.
पण आता मिळालेल्या माहितीनुसार या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून MCQ पद्धतीच्या राहतील. परीक्षा या विद्यापीठाच्या संलग्न सेंटरवर होतील. हि परीक्षा MCQ पद्धतीची असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ९० मिनिटाचा वेळ राहील.
त्यामध्ये प्रत्येक विध्यार्थ्यांला ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्न सोडवायचे आहे. याविषयाची संपूर्ण माहिती एक ते दोन दिवसात विद्यार्थ्यांना देण्यात येईल.परीक्षा या ८ जून पासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची वेबसाइट बघत राहावी.