अकासा नावाची विमान कंपनी भारतीय शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला पुढील वर्षांपासून सुरु करणार आहेत. अकासा एअरलाईन नावाने असणाऱ्या नागरिक उड्डयन मंत्रालय कडून सोमवारी मंजुरी मिळाली आहे. अकासा एअरलाईनने त्यांच्या वेबसाईटवर लिहिले आहे कि, “भारतीय एअरस्पेस या कठीण स्पर्धेत अकासा एअरलाईनने प्रवेश केला आहे. आम्ही नाविन्यपूर्ण पद्धतीने येतो आहे. प्रवाशांना स्वस्त तिकीट मिळेल आणि प्रवास आरामदायी होईल.”
राकेश झुनझुनवाला शेअर बाजाराचे राजे म्हणवले जातात. ते अशा वेळी एअरलाईन सुरु करत आहेत ज्या वेळी इत्तर एअरलाईन कंपन्या तोट्यात जात आहेत. अकासा एअरलाईन एका नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रवाशांना विमानाचा आनंद देतील असे त्यांनी सांगितले आहे. देशातील वॉरेन बफे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअरलाईन्सला सरकारकडून एनओसी प्रमाणपत्र मिळाले आहे.
एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड याबाबत माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले की, कंपनी लवकरच ‘Akasa Air’ या नावाने विमान सेवा सुरू करेल. असे मानले जाते की, पुढील वर्षी उन्हाळीत त्यांचे ऑपरेशन सुरू केले जाईल. खरेदीसाठी आकाश एअरशी चर्चा करीत आहेएअरबस चीफ कमर्शियल ऑफिसर क्रिस्टीन सरकारने अलीकडेच वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिची कंपनी विमान खरेदीसाठी आकाश एअरशी चर्चा करीत आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, आकाश एअरने अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगशीही संपर्क साधला. त्याला बोईंग कडून B737 मॅक्स विमान खरेदी करण्यात रस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोईंग B737 मॅक्स विमानांच्या मदतीने आणि एअरबस A320 विमानांच्या मदतीने विमान उद्योगात स्पर्धा करत आहे.