सध्या रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध पेटलेले आहे. जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या युद्धामुळे अनेकांनी रशियावर टीका केली आहे. तर युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. भारतासह अनेक देशांच्या नेत्यांनी रशियाला सामंजस्याची भूमिका घेत शांततेने मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर काव्यात्मक भाष्य केलं. आपल्या कवितेमध्ये आठवले म्हणतात, पुतिनांचे बिघडलेले आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन. या युद्धाबद्दलच्या त्यांच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, रविवारी रशियासोबत चर्चा करण्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सहमती दर्शविली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अण्वस्त्र सज्ज करण्याचे आदेश दिल्यामुळे या दोन देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढील संयुक्त पावले उचलण्यावर या दोघांनीही सहमती दर्शविली.