राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभागृहामध्ये नेते, मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यातच आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान भवनामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांनी गेटवरच अडवलं आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांना विधान भवनाच्या गेटवर पोलिसांनी अडवलं आहे. कोरोना संदर्भात आरटीपीसीआरची टेस्ट केली नाही म्हणून विधानभवनाच्या गेटवरच रामदास कदम यांनी पोलिसांनी थांबवले आहे. शिवसेनेच्या अनेक मंत्री, नेत्यांवर टीका केल्याने रामदास कदम हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता रामदास कदम हे पुन्हा चर्चेत आला आहे.
रामदास कदम विधानभवनात पोलिसांनी गेटवर अडवत आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याचे कारण दिले आहे. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी अहवाल येत नाही तोपर्यंत विधान भवनामध्ये प्रवेश देणार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे. रामदास कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला. मात्र, तरीही त्यांना आतमध्ये जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर कदम हे बराच वेळ विधानभवनाच्या बाहेर उभे होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.