नागपूर; राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील प्रसिद्ध ‘रेड लाईट’ एरीया अर्थात ‘गंगा जमुना’ परिसर मागील दीड वर्षापासून महाभकास आघाडी सरकार व नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्या परवानगीने सील करण्यात आलेल्या वेशा व्यवसाय करणा-या वस्तीत आज दि २७ मे रोजी ज्वाला जांबुंवतराव धोटे, अध्यक्षा विदर्भ अन्याय निवारण समिती यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयाने वेशा व्यवसायास दिलेल्या मान्यतेच्या स्वागताहार्य गुलाल उधळून वारांगणासह जल्लोष साजरा करण्यात आला.
आज दुपारी गंगा जमुना परीसरात ज्वाला धोटे यांच्यासह वारांगणांनी नृत्य सादर करीत गुलाल उधळून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचे स्वागत केले तर पोलीस प्रशासनास न्यायालयाच्या निकालाचे पालन करण्याचे आवर्जून आठवण करून दिली.
दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलतांना ज्वाला धोटे म्हणाल्यात की, वारंगाणांना समान हक्क मिळण्याचा अधिकार असून न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. खरे पाहता भारतीय संविधान व मानवतेचा आज खरा विजय झाला असल्याचे मत ज्वाला धोटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छेने शरीरविक्रय करणे हे बेकायदेशीर नाही. त्यामुळे अशा व्यक्तीवर पोलिसांना कारवाई करता येणार नाही, असा निर्वाळा दिल्याने गेल्या दीड वर्षांपासून नागपूर पोलीस आयुक्तांच्या कारवाईला सामोरे जात असलेल्या इतवारीतील प्रसिद्ध गंगा-जमुना या वारांगणाच्या वस्तीवर वारांगणांनी आज ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
नागपूर येथे इतवारी भागात गंगा-जमुना नावाने वारांगणाची वस्ती आहे. या वस्ती इतिहास जुना आहे. परंतु अमितेश कुमार हे नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाल्यानंतर येथे शरीरविक्रय करणाऱ्या वारांगणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. पोलिसांच्या कारवाईविरुद्ध अनेकदा वारांगणांनी आंदोलन केली. या आंदोलनाला ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी सातत्याने साथ दिली.
यावेळी ज्वाला धोटे म्हणाल्या, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करतो. गेल्या एक वर्षापासून वारांगणा माता बहिणींनवर व त्यांच्या निष्पाप लेकरांवर नागपूर पोलीस आयुक्तांनी जो अमानुष अत्याचार करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली त्यांचा आम्ही निषेध करतो. याप्रसंगी ज्वाला जांबुवंतराव धोटे, अध्यक्ष विदर्भ अन्याय निवारण समिती, सुनिल चोखारे, अध्यक्ष आम्रपाली संघटना, जावेद पठाण, प्रदेश महासचिव काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग, सरदार कर्णल सिंग, शहर अध्यक्ष खो रि पा, गणेश शर्मा, विदर्भ राज्य संघर्ष समिती इत्यादी पदाधिकारी व समाजसेवी संघटना आनंदोत्सवात सहभागी झाल्या होत्या.