महाराष्ट्रात दीर्घ काळ धार्मिक स्थळे खुली होण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली होत असल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. करोनाची दुसरी लाट संपल्याचे संकेत मिळाल्यावर हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने नागरिकांनी कोविड १९ नियमावलीचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली केली जात आहेत मात्र भाविकांनी तेथे जाताना मास्क लावणे, हात सॅनिटाईज करण्याची काळजी घ्यायला हवी आणि संबंधित धार्मिक स्थळे व्यवस्थापन अशी काळजी घेतली जात आहे याची खबरदारी घेईल. सरकारने करोनाची तिसरी लाट आली तरी तिला तोंड देण्याची तयारी केली आहे पण तरीही नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी.
मुख्यमंत्री म्हणाले राज्यात करोना संक्रमणाचा दर कमी झाला आहे मात्र धोका पूर्ण टळलेला नाही. त्यामुळे टप्याटप्याने सर्व व्यवहार सुरु केले जात आहेत तरी सावध राहणे आवश्यक आहे.