महाराष्ट्रातील रेणुकामाता मंदिर आता एका रोप-वे ने जोडण्याची तयारी केली जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार मध्ये करार झाला आहे आणि आता लवकरच या विशेष प्रकल्पावर काम सुरू करण्यात येईल.
प्रकल्पात रेणुका देवीचे प्रसिद्ध माहूर येथील मंदिर नांदेड जिल्ह्यात दत्त डोंगराला जोडले जाईल. असे झाल्यास लाखो ज्येष्ठ भक्तांना दिलासा मिळेल. ते सहजपणे देवीचे दर्शन करू शकतील, शिवाय वेळेची बचत होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारची एक एजन्सी यांच्यात करार झाला आहे. या तिर्थ स्थळांना रोप-वेने जोडण्यासाठी एकुण 51 कोटी रुपये खर्च केले जातील.
याबाबत PWD चीफ इंजिनियर दिलीप यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे रोप वेची टेक्नॉलॉजी नाही. परंतु WAPCOS कडे ही सुविधा आहे. यावरील चर्चेनंतर माहुर रोप वे प्रोजेक्टसाठी WAPCOS सोबत करार केला आहे आणि त्यांना या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय सल्लागार बनवण्यात आले आहे.
रेणुका माता मंदिर, अनुसया माता मंदिर माहुरगड डोंगरावर आहे. अशावेळी एकाचवेळी सर्व मंदिरांचे दर्शन करणे ज्येष्ठ भक्तांना नेहमी अवघड काम ठरते. परंतु आता याच आव्हानाला आरामदायक करण्यासाठी रोप-वे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रोप-वे झाल्यानंतर ट्रॉलीद्वारे भक्त आरामशीर आणि कमी वेळात सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करू शकतील.