1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

महाराष्ट्रात मंत्रिपदासाठी रिपाई आग्रही; आठवलेंना इतरही पदाची आशा

thumbnail

नाशिक: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि सोबत इतरही पद हवे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. मंगळवारी आठवले हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रीपदाबाबत भूमिका मांडली. विधान परिषदेत नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ पैकी एक आमदार रिपाइंचा असावा, असाही आमचा आग्रह आहे.

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले शिंदे-फडणवीस सरकार राहिलेला कार्यकाळ पूर्ण करेल. २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजप, सेना आणि रिपाइं हे तीन पक्ष सोबत लढतील आणि २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील बंडाळीवर त्यांनी भाष्य केले. शिवसेनेत उभी फूट पडली असून खरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचीच आहे. मोठय़ा प्रमाणात आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे शिंदेंना चांगली संधी आहे. दोन तृतीयांश आमदार असल्याने शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळेल, अशी आशा आहे. रिपाइंमध्ये निवडून येण्याची ताकद नाही. पक्ष बांधणीचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही ज्या पक्षाला पािठबा देतो, तो पक्ष निवडून येतो, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या घराणेशाहीच्या विधानावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भात आठवले यांनी राजकारणात घराणेशाही नसावी ही मोदींची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या काळात रस्ते तयार झाले नाहीत. मोदी सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणात रस्ते तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्ग खराब झाला असून त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

मंत्र्यांनी महामार्गाबाबत तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केल्याने या अपघाताची चौकशी होणे गरजेचे असून दोषींवर योग्य कारवाई व्हायला हवी, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये नितीशकुमार याआधी लालूप्रसाद यादवांसोबत होते. नंतर मोदींसोबत आले. आता ते राजदसोबत गेले असले तरी पुन्हा मोदींसोबत येतील. पंतप्रधान मोदींसमोर कोणताही चेहरा उभा केला तरी फारसे नुकसान होणार नाही. भाजप मित्रपक्षांना संपवीत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे आठवले यांनी नमूद केले.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

2-दिवसीय भारत बंदमध्ये बँकिंग सेवा प्रभावित

March 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी बँकिंग कर्मचार्‍यांसह विविध कामगार संघटनांनी पुकारलेला ४८ तासांचा भारत बंद...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 2024 पर्यंत बनवता येणार पक...

December 9th, 2021 | RAHUL PATIL

प्रधानमंत्री आवास योजनेला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देशातील जनतेच्या कल्याणासाठी शासनाला विविध योजना तयार कराव्या लागतात. ...

१ जुलैपासून प्लास्टिकबंदी ; केंद्राच्या अधिसूचनेनुसा...

April 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

मुंबई: एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जु...