नागपूर: झारखंड येथील गुमला (GUMLA) जिल्हा प्रशासन हे येत्या ५ जून रोजी, जागतिक पर्यावरणाच्या (WORLD ENVIRONMENT DAY 2022) दिवशी १ लाख फळांची रोपटे लावणार आहे. “जीवन संकल्प” ह्या थीमच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गुमला येथील विकास उपायुक्त (development deputy commissioner) हेमंत साती यांनी सांगितले कि,जागतिक पर्यावरण दिवसाला “जीवन संकल्प” घेत पर्यावरणाला वाचविण्यासाठी आम्ही सगळे सहभागी होत आहोत. झाडे लावण्याच्या उद्देश हाच आहे कि, ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रतिकूल परिणामाला तोंड देणे आणि पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आहे.
गुमला ( (GUMLA) ) येथील प्रशासकीय विभाग हे १ लाख फळांच्या झाडांची रोपटे लावणार आहेत. त्यात आंबा, पेरू, लिंबू आणि इतर झाडांचा समावेश आहे. हि सर्व झाडे सरकारी ऑफिसेसच्या पटांगणात, शाळा , कॉलेज, हॉस्टेल, कम्युनिटी आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र आणि सार्वजनिक जमीन येथे लावण्यात येणार आहे,. हा जिल्हा स्तरीय कार्यक्रम तेलगांव गावातून सुरु होणार. शाळा- कॉलेज, प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.